Breaking
ब्रेकिंग

“गुटख्याचा व्यवसाय बिनधास्त! चितळसर–मानपाडा पोलिसांचे संरक्षण आहे का?”

“चितळसर–मानपाडा पोलिसांच्या संरक्षणात गुटख्याचा व्यवसाय सुरू आहे का?”

0 0 4 7 3 0

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चितळसर–मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, दोस्ती एम्पायरसमोर एका दुकानातून कथितरित्या गुटखा विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुकानातून गुटखा घेताना तसेच कागदात गुंडाळलेले पॅकेट उघडताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याच्या आरोपांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य खाद्यपदार्थांच्या विक्री, साठवणूक आणि वितरणावर बंदी आहे. असे असताना जर हा प्रतिबंधित गुटखा असेल, तर तो दुकानात विक्रीसाठी येतोच कसा?

या प्रकरणाची चितळसर–मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि FDA विभागाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच हा माल नेमका कुठून येतो? त्याचा पुरवठा कोण करतो? आणि अशा दुकानांना कोणाचे संरक्षण आहे का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलीस आणि संबंधित विभाग या प्रकरणात नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

आर एल न्यूज नेटवर्क

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 7 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे